swapnaselukar
Please, Subscribe my second channel


Swapna Selukar

देवा, बारीक लक्ष ठेवा आठवलं का? होय हाच तो डायलॉग म्हणत #सावळ्याचीजणूसावली या मालिकेत प्रसिद्धी मिळवत सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे हेच ते श्रीमान #mayurkhandge. आज त्यांची जालना हायवे वर अचानक भेट झाली आणि मी ओरडले - "अहो, सावलीचे godfather." त्यांना वाटलं ही काही बडबडत आहे. मग मी त्यांच्या जवळ जाऊन विचारलं, तेच आहेत याची खात्री पटल्यावर (नाहीतर उगाच पोपट व्हायला नको 😅)आणि फोटो साठी विनंती केली. त्यावेळेसचा हा धावता क्षण.
त्या मालिकेतील त्यांचा ती सकारात्मक भूमिका, या पात्राने मालिकेत दाखवून दिलंय की, पोटचं पोर नसलं तरी दुसऱ्याच्या लेकरावर out of the way जाऊन प्रेम करणं, वाचनाची कटी बद्धता, मानसकन्ये साठी स्वतःचा इगो सुद्धा बाजूला ठेवता आला पाहिजे, भैरवी वझे सारख्या मोठया प्रस्थाला पाणी पाजण्याची तयारी ती सुद्धा एका मानसकन्येसाठी? अजून बऱ्याच काही गोष्टी या पात्राकडून शिकण्यासारख्या आहेत.
Nice to meet him.
#mayurkhandge
#savalyachijanusavali
#actor

2 months ago | [YT] | 7

Swapna Selukar

1 year ago | [YT] | 20

Swapna Selukar

*मातृत्व एक सुखद क्षण*

आज आनंदी आनंद झाला |
माझ्या बाळाचा हा वाढदिवस आला ||

होय. हाच तो दिवस ज्या दिवशी माझं खऱ्या अर्थाने प्रमोशन झालं. आणि मला *आई* नावाची महान पदवी बहाल झाली. विशेष म्हणजे वशिल्याशिवाय होणारं हे एकमेव प्रमोशन असावं 😄.  आणि तो क्षण म्हणजे  *स्वर्ग सुखाची भेट आजही धन्य जीवन झाले.*
एक स्त्री,मुलगी, बहीण, पत्नी, सून,भावजय, मावशी, मामी ही सर्व नाती मी चांगल्या रीतीने निभावण्याचा प्रयत्न करत आले आहे आणि आता सुद्धा करते आहे.
               पण ह्या नात्यातली ती ओढ, तो ओलावा, तो जिव्हाळा, ते  वात्सल्य, ती माया, ते प्रेम सर्वकाही एकाच शब्दात सांगायचं झालं, तर *स्वर्गसुख*.
              आई नेहमी म्हणायची की, तू आई झाल्यावर तुला कळेल. म्हणून मुद्दामहून मला आईला सांगावंसं वाटतंय की, तू ज्या अर्थाने बोलत होतीस ते कळलंय मला.
           आजही माझ्या बाळाच्या जन्माचा प्रसंग अगदी ताजातवाना माझ्या डोळ्यांसमोर चलचित्रपटासारखा फिरतो.  11 ऑक्टोबर 2022 मंगळवारी मला त्या विधात्याने आई होण्याचं सुख प्राप्त करून दिलं. प्रत्येक आई तब्बल 9 महिने आपल्या बाळाचा आवाज ऐकण्यासाठी आसूसलेली असते, तशीच मीसुद्धा. माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला अन माझे डोळेसुद्धा पाणावले. डॉक्टरांनी मला बाळ दाखवलं, तसं मी त्यांना आधी सांगूनच ठेवलं होतं की, सगळ्यात आधी माझ्या बाळाचा चेहरा मला दाखवा. आणि त्यांनी मलाच दाखवलं. आणि त्याच्या जन्माच्या वेळी प्रचंड पाऊस पडत होता, तर माझी दिदी म्हणाली की, कृष्ण जन्माच्या वेळेस देखील खूप पाऊस पडत होता, तसाच आज देखील पडतो आहे. आणि खरोखरच अगदी कृष्णा सारखाच नटखट आहे माझा हा ऋग्वेद.
             तशी तर मी भित्री भागुबाई. पण त्यादिवशी मी आई झाले होते आणि एक विलक्षण शक्ती परमेश्वराने मला दिली की काय कोणास ठाऊक. कसलाच त्रास नाही झाला मला. बाळाकडे पाहून सर्वकाही विसरून गेले होते मी.
               सगळ्याच आई-वडिलांसाठी आपल्या मुलाचा वाढदिवस हा फार खास असतो. त्याचा प्रत्येक वाढदिवस हा त्याला आवडेल आणि त्याच्या लक्षात राहील असा  साजरा करण्यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतात. अगदी तसंच माझ्यापेक्षा जास्त ऋग्वेद च्या बाबांचंदेखील आहे बरं का! वाढदिवस जसा जसा जवळ येत होता, तसंतसं त्यांचं planning सुरूच होतं. आणि आमच्या घरात *ऋग्वेद* म्हटलं की अगदी कधीही न बोलणारी आजीदेखील घंटो न घंटे बोलते. थोडक्यात काय तर *ऋग्वेद* च नाव काढलं की, बाकीच्या सगळ्या विषयांना पूर्णविराम हो बाकी काय!
                     आई मुलाला जन्म देते त्या दिवसापासून केवळ त्याच्यासाठीच झटत असते. अशा लाडक्या मुलाचा वाढदिवस आईसाठी खूपच खास असतो. हे मी इतकं ठामपणे कसंकाय म्हणू शकते हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. त्याचं कारण असं की, आजही माझी आई मला वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळी 8:30 लाच देते. कारण त्याचवेळेस माझा जन्म झाला. म्हणजे आजही तो प्रसंग माझ्या आईच्या डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो.
                आईच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या , बाबांच्या डोळ्यांचा ताराअसणाऱ्या , दोन्ही आजींना सळो की पळो करणाऱ्या, दोन्ही आजोबांची काठी पळवणाऱ्या, दोन्ही मावशींना स्वतःच्याच मुलाची माया न करू देता माझीच माया कर असं म्हणणाऱ्या, आत्याला गोड smile देऊन खुश करणाऱ्या, वेदांत दादासोबत खूप खेळणार पण त्याच्या गाडीवर बस म्हटलं की मोठमोठ्याने रडणाऱ्या, आरव दादाला तुझं माझं जमेना तुझ्यावचून करमेना असं करणाऱ्या, अवनी ताई मैत्रिणीकडे जात असता मलाही घेऊन चल असा हट्ट करून रडणाऱ्या, एकही दिवस न चुकता चंदनाचा टिळा लावत असताना अंबरीश दादा आणि परिक्षीत दादाची आठवण काढणाऱ्या, and yes last but not the least कॉलनीच्या दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो ,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे, हळूच कानात सांगून जातो.

                       आणि हो, असं म्हटलं जातं की, *Behind every successful man there stands a woman" But I must say, " Behind every successful working woman like me there stands her entire family ".*
                     ऋग्वेद येण्यापूर्वी नोकरी करणं तसं फारसं कठीण नाही गेलं, पण ऋग्वेद झाल्यापासून माझ्या माहेर आणि सासरच्या माणसांमुळेच नोकरी करणं सुलभ झालंय. मी खरोखरच माझे आई-बाबा, आई - पप्पा, ऋग्वेदचे बाबा,बहिणी, अवनी, आरव, वेदांत या सर्वांचे या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते.
आतापर्यंत मी भरपूर लेख लिहिले, मात्र हा लेख लिहिताना होणारा आनंद काही निराळाच आहे. असं थोडंच आहे की, फक्त मुलांनी आईवर लेख लिहावा. म्हणून आज एका आईने मुलाबद्दल लिहिलेला हा लेख.

सौ. स्वप्ना पराग तांबोळी

1 year ago | [YT] | 5

Swapna Selukar

There is no difference between figure of speech and parts of speech. It means both are same thing.

1 year ago | [YT] | 5

Swapna Selukar

Rugved is attend the honourable Modi's Man ki baat. ( correct the sentence ).

1 year ago | [YT] | 6

Swapna Selukar

ज्या व्यक्तीशिवाय आपलं विशेषतः मुलींचं पानही हालत नाही, म्हणजे अशा व्यक्तीचा वाढदिवस स्पेशलच. हो ना!
मग ती व्यक्ती कोणती 🤔? ती म्हणजे आपली *जन्मदात्री.*
खरंच नाही करता येत हो तिची व्याख्या. हे सारं वक्तव्य झालं आईचं. पण माझ्या आईच म्हणाल, तर ती कायमच माझ्यासाठी स्पेशल व्यक्ती. घरात मी सगळ्यात लहान म्हणजे शेंडेफळ म्हणजेच सगळ्यात लाडकी. म्हणूनचं की काय, पण आईला कधी माझा राग आला तर ती कधीच माझ्यावर रागावणार नाही, रुसणार नाही. आणि रुसेल ती आई कसली!
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी, माझ्यावर खूप प्रेम करणारी, गावात सासर असूनही मी माहेरून निघाले की, पदर डोळ्याला लावणारी, अतिशय लाघवी, कोणाहीपेक्षा मला ९ महिने जास्तीत ओळखणाऱ्या, माझी पुरेपूर काळजी घेणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹. आई योगेश्वरी देवीच्या कृपेने तुला उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभाव.

1 year ago | [YT] | 8

Swapna Selukar

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व 🥰

2 years ago | [YT] | 27

Swapna Selukar

आपणास व आपल्या परिवारास *अक्षय तृतीयेच्या,भगवान परशुराम जयंती तथा राष्ट्रसंत बसवेश्वर जयंतीच्या* मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!
🙏🙏

2 years ago | [YT] | 10