From being the first elected Youth President to being an elected Corporator for Pune Municipal Corporation, Sunny Nimhan has come a long way. Sunny has done BE Civil from Pune University and Ms. in Property and construction management from University of Melbourne Australlia.

Sunny Nimhan also is the only Cororator in India who has completed a stupendous task of cycling from Delhi to Pune. Spreading awareness regarding environmental issues and health was Sunny's intention behind i this wondertl feat of cycling 1540 kms. Sunny Nimhan was awarded Efficient Corprator by Maharashtra Rajya Patrkar Parishad Sangha in 2016 for his tilustrlous work.
Sunny Nitmhan is a Managing Director of Sunny's World, an internationally acclaimed fun destination for family, corporates and for weekend getaways, well equipped with world-class leisure, biggest adventure park and recreational facilities.
Multifaceted Sunny is Co-Owner of a well-known food chain Thikana.


Sunny Nimhan

"समस्यांचे निराकरण, ३ नंबरचे बटन !"

#Aundh #Bopodi #Prabhag8 #Pune #punemuniciplecorporation

1 month ago (edited) | [YT] | 4

Sunny Nimhan

पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा सनी निम्हण!

#Aundh #Bopodi #Prabhag8 #Pune #punemuniciplecorporation

1 month ago | [YT] | 4

Sunny Nimhan

संवादातून समृध्दी साधणारे सुसंस्कृत नैतृत्व..!

#Aundh #Bopodi #Prabhag8 #Pune #punemuniciplecorporation

1 month ago | [YT] | 1

Sunny Nimhan

सुरांचा भव्य महोत्सव... पुणे आयडॉल!

पुणे शहर व परिसरातील गायक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी 'पुणे आयडॉल' ही स्पर्धा सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करत आहोत. पुण्यातील गानरसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेचे यंदाचे २३ वे वर्ष आहे. स्पर्धेच्या यंदाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत आज आपल्या झुंज निवासस्थानी सोमेश्वर फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

पुन्हा एकदा त्याच उत्साहाने स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, तुम्ही देखील सज्ज व्हा, सुरांचा हा महोत्सव अनुभवण्यासाठी, सुरांमध्ये न्हाऊन निघण्यासाठी! सध्या आसमंतात तळपणाऱ्या सूर्यादेवाच्या लाहीलाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा देणारा हा सुरांचा हा गारवा अनुभवुया!

शीतल, सुरेल गीतांचा हा नजराणा अनुभवण्यासाठी नक्की या! आपल्या परिचयातील गानरसिक व गायक कलाकारांना देखील आवर्जून सांगा.

#song #puneidol #music #pune #artist

9 months ago | [YT] | 4

Sunny Nimhan

प्रकाशन सोहळा 'ऐकलंत का?' या पुस्तकाचा... संदर्भ आबांच्या नेतृत्वगुणांचा!

पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, आमचे मित्र मा. सुनीलदादा चांदेरे यांनी लिहिलेल्या 'ऐकलंत का?' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी आबांविषयी लिहले आहे. आबांचे आणि सुनीलदादांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अविरत जनसेवा आणि सतत लोकसेवेच्या आणि विकासाच्या कामाचा ध्यास हा त्यांना जोडणारा धागा होता. पुण्यामध्ये मेगासिटी प्रकल्प साकारण्याचे ठरले त्यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांचा त्याला विरोध होता तेव्हा सुनीलदादा आणि आबा एकत्र आले. आबा शिवाजीनगराचे आमदार असताना पंचकोशीतील परिसरामध्ये अनेक विकासकामे त्यांनी विचारविनिमयातून साकारले. आबांच्या व्यक्तिमत्वाचा आणि नेतृत्वाचा त्यांना लळा होता. त्यातूनच त्यांच्यात विशेष सख्य निर्माण झाले.

पुणे शहराला 'मंडळ संस्कृती' आहे. लोकमान्यांच्या काळापासून या संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या कार्यासाठी विविध मंडळे स्थापन झाली. कालांतराने वर्षभर इतरही उत्सव आणि समारंभाचे आयोजन हि मंडळे करायला लागली. बदलत्या ट्रेंडनुसार या उत्सवांना इव्हेंटचं स्वरूप यायला लागले. दहीहंडी, नवरात्रोत्सव, श्रीरामनवमी असे विविध उपक्रम त्यात समाविष्ट करण्यात आले. त्यातला फक्त नाचगाणे, धमाल, मस्ती आणि धांगडधिंगा याला महत्व येऊन त्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक आशय दुय्यम ठरत गेला. वर्गणीच्या माध्यमातून जमा होणारा अमाप पैसा आणि त्याचा विधायक कामासाठी विनियोग याचे समीकरण जुळताना दिसेनासे झाले. त्यामुळेच या मंडळांना आर्थिक मदत करताना सर्वसामान्यांच्या मनांत साशंकता निर्माण होत गेली. आबा एक संवेदनशील आणि संस्कृतीप्रिय व्यक्ती होते. अनेक मंडळांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु वर्गणीला त्यांचा विरोध होता. ते म्हणायचे, "काम काय हे ते सांगा, काम करतो पण वर्गणीचे नाव काढू नका!" खरे म्हणजे आमदार असलेल्या एका राजकीय नेत्याने सार्वजनिक मंडळांना वर्गणी न देण्याचा मानस दाखवणे हे जरा धाडसाचे काम होते. यातून तरुणवर्ग मोठ्याप्रमाणात दुखावला जाण्याची शक्यता असते. त्यांच्यासाठी झटणारे अनेक कार्यकर्ते याच मंडळांचे सदस्य असायचे. परंतु त्याची जराही तमा न बाळगता आबा आपल्या निर्णयावर ठाम असायचे.

आजकाल अनेक नेते या मंडळांच्या माध्यमातून आपले कार्यकर्ता नेटवर्क उभे करताना दिसतात. मंडळाचा उद्देश्य, सामाजिक बांधिलकी, विधायक कामासाठी निधीचा वापर हा योग्य पद्धतीने होतो कि नाही? पदाधिकारी यांचे चारित्र्य आणि पात्रता योग्य आहे कि नाही? याकडे कानाडोळा करत अनेक राजकीय नेते मंडळांना डोळे बंद करून भरघोस आर्थिक मदत करतात. त्यांचा उद्देश कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे यापलीकडे असताना दिसत नाही. यातूनच मंडळावर सामाजिक वचक राहिलेला नाही. मंडळे आपल्या उद्देशापासून भरकटताना दिसतात. आर्थिक गैरव्यवहार होताना दिसतात. यातून मंडळ संस्कृतीची प्रतिमा डागाळत चालली आहे. खरे म्हणजे राजकीय नेत्यांनी यावर वचक ठेवायला हवा. मंडळांना शिस्त लावताना काही कठोर निर्णय घ्यायला हवे पण तसे होताना दिसत नाही. उलट राजकीय वरदहस्त दिला जातो.

मंडळाची हि अवस्था बघितली की आबांची मंडळाच्या वर्गणी विषयीची भूमिका मनाला पटते. त्यांना पैसा देण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी त्यांच्यामार्फत विधायक कामे साकारण्यावर भर दिला पाहिजे हे जास्त संयुक्तिक वाटते. सुनीलदादांनी आपल्या पुस्तकात आबांविषयी दिलेला संदर्भ हेच सांगून जातो. या संदर्भातून आबांच्या नेतृत्वातील एक वेगळेपण आणि कडवट सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. याबद्दल सुनीलदादांचे मनापासून आभार!

‪@sunilchandere3221‬

#thankyou #sunilchandere #pune #book

9 months ago | [YT] | 8

Sunny Nimhan

'१३' मेरा साथ...एका 'मधुरम' प्रवासाची बात....!

मधूरा...जीवनाच्या वाटेवर अर्धांगिनी म्हणून तू साथीला आलीस त्या क्षणाला बघता बघता १३ वर्ष पूर्ण झाले. पत्नी म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना 'मैत्रीण' म्हणूनही तू एक अतूट नातं निर्माण केले. त्यामुळे मनातील प्रत्येक गोष्ट तुझाशी शेअर करण्याचं समाधान काही औरच असतं.
चढ, उतार, सुख, दु;ख, अनुकूलता, प्रतिकूलता या सगळ्यात तू नात्यातला गोडवा जपत आलीस म्हणून तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण 'मधुरम' होऊन जातो. सहजीवनातला हा गोडवा असाच जपूया...


Sweet Thirteen....!

Dear Madhura.... It's been 13 years since you entered my life and the journey says it all. You have been the strongest support through all ups and downs. You are the one with whom I feel complete. I am fortunate to have a close friend in you. I must admit that you are the strongest pillar of our family. Multiple roles you play, keep everyone happy and never let that smile on face fade away. On our special day I thank the almighty for gifting me a soul mate like you. Happy wedding anniversary to us!

9 months ago | [YT] | 4

Sunny Nimhan

On World Book Day, I had the joy of meeting entrepreneur Mrinal Kenchi at Sunny’s World. He gifted me a book written by his father, renowned journalist and editor Harish Kenchi — a close friend of my father, Mr. Vinayak Nimhan.

Now, Mrinal and I continue that bond into the next generation. Moments like these remind me of the lasting power of stories, words, and relationships.

9 months ago | [YT] | 2

Sunny Nimhan

आपल्या औंधचा कुस्तीपटू विराज विकास रानवडे याने हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या भारत केसरी दंगल स्पर्धेत "कुमार भारत केसरी" हा किताब पटकावत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.

वडील विकास रानवडे यांनी वस्ताद म्हणून त्याला केलेल्या योग्य मार्गदर्शनातून विराज आज लाल मातीत यशस्वी ठरला आहे. त्याचे हे यश पुण्यासह महाराष्ट्रातील मल्लांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हा विश्वास आहे. 

विराजचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व त्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
‪@virajranawade36‬
#kusti #virajranawadd #pune

9 months ago | [YT] | 4

Sunny Nimhan

गीताई लॉन्स अ‍ॅण्ड बँक्वेट हॉल येथे सदिच्छा भेट देऊन, तरुण उद्योजक सुनील शेंडकर व प्रसाद शिंदे यांच्याशी व्यवसायातील अनेक पैलूंवर मनमोकळा संवाद साधला.

व्यवसायात केवळ सेवा देणे नव्हे तर ग्राहकांशी सुसंवाद साधणे, व्यवस्थापन कौशल्य वाढवणे आणि नव्या कल्पनांची अंमलबजावणी करणे ही आजच्या काळातील गरज आहे.

व्यवसायात टिकून राहण्यासाठी पारदर्शकता, वेळेचं व्यवस्थापन आणि ग्राहकांचे समाधान ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. या नवउद्योजक मित्रांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, भविष्यात उत्कृष्ट सेवा आणि व्यवस्थापनातून परिसरात एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून नाव कमवावं, ही अपेक्षा यावेळी व्यक्त केली.


‪@GitaiBanquetsConventionCenter‬

#Gitaibanquetsandconventioncenter #pune

9 months ago | [YT] | 0

Sunny Nimhan

पुणे बुलेटिन न्यूज पोर्टल द्वितीय वर्धापनदिन आणि जन्मदिनानिमित्त आज संपादक केदार कदम यांना डीपी रोड, औंध येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

अत्यंत अभ्यासपूर्ण, निर्भीड आणि सामाजिक भान जपत पत्रकारितेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पुणे बुलेटिनच्या कार्यास मी नेहमीच दाद देतो. केदार आणि टीमचे काम कौतुकास्पद आहे.

आपले हे निष्पक्ष पत्रकारितेचे व्रत अधिक व्यापक होवो आणि आपल्याला नवनवीन उंचीचा यशस्वी टप्पा गाठता येवो, हीच मंगलमय सदिच्छा! पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलच्या संपूर्ण टीमला यशस्वी द्वितीय वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

पुणे बुलेटिनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपादक केदार कदम यांनी 'गावभर चर्चा' हे पॉडकास्ट सुरू केले आहे. यानिमित्त त्यांना व टीमला या नव्या आयामासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#PuneBulletin #KedarKadam
#JournalismWithIntegrity #वर्धापनदिन
#SecondAnniversary #निर्भीडपत्रकारिता
#DigitalMedia #LocalNews
#PuneNews

9 months ago | [YT] | 1