UK TV NEWS

दिव्यांगजन मतिमंद वंशीकाला हक्काचे जमीन मिळणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले चौकशीचे आदेश

*[ देवा मामा मला न्याय द्या ]*

*मुंबई आज़ाद मैदान ला मानवता उर्फ वंशिका डोंगरे ला न्याय हक्क मिळण्यासाठी सौं अनिता कोलते यांचे बेमुदत आमरण उपोषण




मुंबई : नागपुर ची मानसिक दिव्यांग तरुणी ने महाराष्ट्र च्या मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागितला न्याय.

कु. मानवता उर्फ ​​वंशिका रविकांत डोंगरे हिला न्याय व हक्क देण्याकरिता आझाद मैदान मुंबई, येथे सौं. अनिता कोलते सामाजिक कार्यकर्त्या ( ओपन एज्युकेशन) बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सोमवारी दि.१६ फेब्रुवारी २०२६ पासून हे आंदोलन सुरु झाले. विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. "निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, आता नाही तर कधीच नाही "असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने समिती स्थापन करून कार्यवाही करून पीडितेस न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी या वेळेस करण्यात आली. कु. मानवता ही दिवंगत सुखदेव विठोबा डोंगरे ( माजी आमदार, तिरोडा ) यांची नात आहे आणि २००३ मध्ये त्यांचे वडील दिवंगत रविकांत डोंगरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांची आई श्रीमती वनिता डोंगरे यांनी त्यांची काळजी घेतली. तथापि,असा आरोप आहे की तिच्या वडिलांच्या मृत्यू नंतर तिला वारसाने मिळालेल्या जमिनी, मालमत्ता आणि इतर मालमत्तेतून बेदखल करण्यात आले, शिवाय, तरुणीचा आरोप आहे की, संकेत अनिल डोंगरे (सचिव, मानवता हायस्कूल, नवयुवक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कुंजीलाल पेठ, बाबूलखेडा नागपूर आणि श्रीमती चारुशीला संजय डोंगरे उपाध्यक्ष नवयुवक एज्युकेशन सोसायटी आणि इतर संबंधित पक्षांनी तिला मानसिक छळ आणि आर्थिक छळ आणि वारसा हक्काचे दमन केले आहे. संबंधित पक्षावर कठोर फौंजदारी कार्यवाही ची मागणी निवेदनात केली असून पुढे म्हटले आहे की, सर्वेक्षण क्र.१७४/३, ५२१/४, १३०आणि १२९ मधील जमिनी सरकारने अधिग्रहित केले आहेत आणि संबंधित वारसांना पूर्ण भरपाई मिळालेली नाही आहे म्हणून संपूर्ण भरपाई व्याज सहित त्वरित द्यावी. आणि या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. अशी मागणी आहे. शिवाय असे म्हटले आहे की, कु. मानवता यांना मौजा वायगाव ( ता. समुद्रपूर, जि. वर्धा ), सवारी (ता. भंडारा आणि गोंदिया जिल्हा ) व इतर मालमत्ता वारसा हक्काने मिळाल्या असून त्याचा हक्क तिला दिल्या गेला नाही.केंद्र आणि राज्य सरकार यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि सर्व जिल्हाधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.आंदोलन स्थळी मानवता हिने हातात आपल्या मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांचा फोटो हातात घेऊन न्यायाची मागणी केली. प्रशासनाने याकडे संवेदनशीलतेने या प्रकारनाकडे पाहावे, अशी मागणी केली आहे.सामाजिक कार्यकर्ते सौं. अनिता कोलते संचालक (ओपन एज्युकेशन ), व डाँ. योगेंद्र कोलते संस्थापक सचिव (ओपन एज्युकेशन ) यांच्या नेतृत्व व मार्गदर्शना खाली उपोषण सुरु होते, दि.१८ फेब्रुवारी ला मा. ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांची भेट घेण्यात आली आणि भेटी मध्ये मंत्री महोदयानी सविस्तर विषय समजून घेऊन, विभागीय अहवाल मागवून या विषयावर सुनावणी तात्काळ लावण्याचे आदेश दिले. उपोषण कर्त्यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडवणीस साहेब, महाराष्ट्र राज्य, व मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब व मा. श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच मुंबई पोलीस विभागाचे व प्रसार माध्यमाचे आभार व्यक्त करून हे उपोषण तूर्तास स्थागित करण्यात आले आहे.

4 days ago | [YT] | 1

UK TV NEWS

पुणे ग्रामीण (LCB) पोलीस व शिरूर पोलिसांनी संयुक्त केलेल्या अंमली पदार्थविरोधी कारवाई करा..SIT स्थापना करा..
प्रतिनिधी.....
अहिल्यानगर पोलीस कर्मचारी शामसुंदर विश्वनाथ गुजर (नेमणूक एलसीबी, बक्कल नं. २२०५) याच्या मालमत्तेची त्वरित सखोल चौकशी करून त्यास मदत करणारे त्याचे नातेवाईक व सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारा

नुकतेच पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल १० किलो ७०८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करताना या रॅकेटचा सूत्रधार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर, बक्कल नं. २२०५) असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, गुजर याने हे ड्रग्ज पोलिसांच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा कस्टडीत असलेल्या जप्त मुद्देमालातूनच चोरी करून विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या मुख्य कार्यालय शासकीय विश्रामगृहपाठीमागे मारो योनिमगाव को, ता. राहाता, जि. अहिल्यानगर कार्यालय द्वारा संप होटल विकास हायवे कसे, ता. जि. नाशिक
पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचाऱ्याने केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातीलच खाकीतील एकाने धक्कादायक पटना दरम्यान, अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून जप्त केलेल्या मुद्देमालातून ड्रग्ज रॅकेट चालविण्याचा केल्याचे समोर आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिरूर परिसरात एमडी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री डंबेनाला परिसरात छापा टाकून शादाब रियाज शेख (वय ४१, गॅरेज चालक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम एमडी व दुचाकी, असा सुमारे २ कोटी १० लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पुढे नेत असताना पोलिसांच्या हाती पारनेर तालुक्यातील माऊली शिंदे व त्याच्या पंटरची नावे लागली. माऊली शिंदेकडून ९ किलो ६५५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीत शिंदेने हे ड्रग्ज पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याच्याकडूनच घेतल्याची कबुली दिली. तांत्रिक तपासातही गुजरचा थेट सहभाग निष्पन्न झाला. दरम्यान, नगर एलसीबीतील गुजरचे नाव समोर येताच वरिष्ठांच्या आदेशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक, अहिलयानगर कार्यालयात धडक देऊन एलसीबीच्या कार्यालयात हजर असलेल्या शामसुंदर गुजरला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधिक्षक कार्यालयाने कारवाई केली आहेः, परंतु या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेतीलच पोलीस शामसुंदर विश्वनाथ गुजर याचे नाव समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वासार्हता राहिलेली नाही. विशेष म्हणजे शामसुंदर गुजर याची ऑगस्ट २०२५ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली असुन अहिल्यानगर जिल्ह्यात जप्त होणाऱ्या अंमली पदार्थांच्या मुद्देमालाची जबाबदारी त्याच्याकडे होती. यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र मुद्देमाल कक्ष असुन या कक्षाची चावी त्याच्याकडेच असायची व या विभागाचा सर्व पत्रव्यवहार देखील तोच सांभाळत असलयाचे समजले
आहे. तसेच पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांचे या कक्षावर नियंत्रण असून देखील गुजरने आपली चलाखी वापरत जप्त ड्रग्जच्या जागी मैदा भरून ठेवून संशय टाळण्याचा प्रयत्न करून तपासाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. पोलीस अधीक्षक व निरीक्षकांचे नियंत्रण असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी कशी झाली, यावर या प्रकरणामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी हेच वाळू तस्कर, अवैध धंदेवाले, ठेकेदार यांना मिळून गुन्हेगारीला मदत करत असल्याची चर्चा आहे. तसेच बऱ्याच पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचा यात थेट सहभाग असल्याचेही जाणवते. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे म्हणजे मटका, जुगार क्लब, ऑनलाईन मटका, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, अवैध वाळू विक्री, बिंगो नामक ऑनलाईन जुगार असे अनेक व्यवसाय जोमात सुरू आहेत. या व्यवसायांस अनुसरून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे व त्याचा त्रास सामान्य लोकांना होत आहे. मुख्यतः यात अहिल्यानगर पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचाच सहभाग असल्याची चर्चा असल्याने या अवैध धंद्यांना आळा बसणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सदरील सर्व प्रकरणाची आपल्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच अंमली पदार्थप्रकरणी शामसुंदर गुजर (बक्कल नं. २२०५) याने कमविलेल्या व त्याचे नातेवाईक, मुले, पत्नी, सून इत्यादींच्या मालमत्तेसह गुजर यास या अवैध धंद्यास मदत करणारे त्याचे सर्व साथीदार तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचीदेखील सदर प्रकरणी त्वरित सखोल चौकशी होवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवार दि. २७/१/२०२६ पासून मुंबई आझाद मैदान येथे असंख्य कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल. उपोषण काळात उपोषणकर्ते यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच चौकशी अधिकारी हेच जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.

सदरील तक्रार संदर्भात खालील मुद्यांची त्वरित चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी.

१) पुणे ग्रामीण एलसीबी आणि शिरूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गॅरेज चालक शादाब रियाज

शेख याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले असल्याने या गुन्ह्याशी संबंधित शादाब शेख व अहिल्यानगर पोलीस कर्मचारी शामसुंदर विश्वनाथ गुजर (बक्कल नं. २२०५) यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्यांच्या सर्व नातेवाईक यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) ची तपासणी करून दोषी आढळल्यास त्वरित

२) एमडी (मेफेड्रोन) तस्करीप्रकरणी संबंधित सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांची SIT मार्फत चौकशी करून अधिकाऱ्यांना पाठिशी न घालता १५ दिवसांत कारवाई करून संबंधितांना त्वरित निलंबीत करून वेतना करण्यात यावी. व्यतिरिक्त कमविलेल्या अवैध मालमत्तेची चौकशी करण्यात येवून सर्व अवैध मालमत्ता शासन दरबारी जमा
आलेल्या MD (मेफेड्रोन) ड्रग्जचे पुढे काय करण्यात आले याची चौकशी करा

४) अहिल्यानगर पोलीस दलात गुन्हे शाखा (LCB) कार्यरत पोलीस कर्मचारी व ड्रग्ज माफिया शामसुंदर चौकशी करून दोषी आढळल्यास नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. गुजर याच्या या बिझिनेसमध्ये शामील अहिल्यानगरचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची सखोल पूर्ण करण्यात यावी.
५) उपरोक्त प्रकरणाची चौकशी करावी
त्वरित SIT ची स्थापना करून विनाविलंब १५ दिवसांत चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे

2 weeks ago | [YT] | 1

UK TV NEWS

*‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात*

शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो.

‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत.
चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत.

चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे यांनी सांभाळली आहे.

पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

3 weeks ago | [YT] | 3

UK TV NEWS

वल्लभबाग लेन व टिळक रोडवरील अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलन
मुंबई प्रतिनिधी

घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन व टिळक रोड परिसरात वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे व सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांकडून सातत्याने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी, घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार मा. पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग लेन व टिळक रोड येथे अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात भव्य जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ व ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.

या दोन्ही रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून, त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी व व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन उभारण्यात आले.

या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच घाटकोपर पूर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडण्यात आले असून, लवकरच या परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

2 months ago | [YT] | 4

UK TV NEWS

*मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत – पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन*

*"कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन*

नागपूर, दि. १४:- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग कार्यशाळेत साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेत नागपूरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमधील १०० हून अधिक व्यावसायिक कलाकारांनी सहभाग घेतला. “विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक विचार कलाकारांनी आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडले. कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या निवडक ५० उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले असून, मंत्री पाटील यांनी या कलाकृतींची सखोल पाहणी केली.

प्रदर्शनातील निवडक पेंटिंग्जचा आस्वाद घेत मंत्री पाटील यांनी कलाकारांशी व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. ‘विकसित भारत’ ही संकल्पना विविध माध्यमांतून कशी अभिव्यक्त केली आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेत कलाकारांच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयातील फोटोग्राफी विभागास भेट देऊन विद्यार्थ्यांकडून फोटो शूट करून घेतले. तसेच प्रिंटमेकिंग विभागास भेट देत लिथोग्राफी प्रक्रियेतील तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्यांचे विशेष कौतुक करत त्यांनी चॉकलेट देऊन प्रोत्साहन दिले.

*या प्रसंगी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते “कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.*

महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या बाहेर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘कलाकट्टा’ या आउटडोअर गॅलरीमध्ये बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव या विषयावर आधारित पोस्टर्स प्रदर्शित केल्या आहेत.

भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासात कला शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन करत मंत्री पाटील म्हणाले की, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळा व कला प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मंत्री श्री पाटील यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

2 months ago | [YT] | 1

UK TV NEWS

पदोन्नततील आरक्षण व वर्गीकरण बाबत कामगार नेते भारत वानखेडे यांनी सामाजिक न्याय मंत्री यांना दिले निवेदन.

⬛ माजी सामाजिक न्याय मंत्री आ. राजकुमार बडोले यांचे उपस्थितीत कामगार नेते भारत वानखेडे यांनी घेतली सामाजिक न्याय मंत्री यांची भेट.
⬛ मुख्यमंत्री यांचे सोबत बैठक घेण्याची मागणी

नागपूर ( प्रतिनिधी)
राज्य विधान मंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन कालावधीमध्ये अनुसूचित जाती /जमाती/ वि.जा भज/ वि.मा.प्र. शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय मुंबई या संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत वानखेडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री महोदय माननीय संजय शिरसाट साहेब यांची दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी भेट घेतली.याप्रसंगी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय श्री राजकुमार बडोले साहेब तथा संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळांने मागासवर्गीय समाजाच्या खालील प्रश्नाबाबत सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिमहोदयांना निवेदन देऊन कार्यवाही बाबत विनंती केली आहे.
(1) मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नती मधील आरक्षण प्रक्रिया पूर्ववत सुरू करणे- राज्यात सध्या सन 2017 पासून मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याची आरक्षण प्रक्रिया बंद असल्याने हे अधिकारी कर्मचारी सेवा जेष्ठतेनुसार पात्र असून सुद्धा पदोन्नती पासून वंचित आहेत. मागासवर्गीयांचा आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील असून याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी आदेश काढून मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत स्पष्टपणे निर्देश दिले आहेत.तरी न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याची आरक्षण प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात यावी.
(2) अनुसूचित जातीची वर्गवारी करणारा निर्णय रद्द करणे - अनु.जातीची अ ब क ड अशी वर्गवारी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने समितीचे गठन केले आहे.याबाबत याबाबत असे नमूद करण्यात येते की अनुसूचित जातीमध्ये 58 जातींचा समावेश असून यापैकी फक्त एका जातीने वर्गवारी करण्याची मागणी आहे. इतर कोणत्याही जातीची वर्गवारी करण्याची मागणी नाही. तसेच अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड असे विभाजन केल्यामुळे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत असलेल्या अनुसूचित जाती मधील जाती -जाती मध्ये भेदभाव निर्माण केल्यासारखे होईल, आणि हे संविधानाच्या समानतेच्या तत्त्वाविरुद्ध होईल. त्यामुळे संपूर्ण अनुसूचित जातीवर अन्याय करणारा अ ब क ड अशी वर्गवारी करण्याबाबतचा शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी या समाजाची मागणी आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री महोदयांनी संघटनेच्या वरील मागण्यांबाबत तातडीने शासन स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येवून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत वानखडे, राज्य कार्याध्यक्ष अंबादास चंदनशिवे यांच्या समवेत संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुबोध भारत, कोषाध्यक्ष सी. आर.निखारे व श्रीमती दिपाली शहारे ,नीलिमा कांबळे श्री मोगल तसेच अन्य पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

फोटो -- सामाजिक न्याय मंत्री ना संजय शिरसाठ यांना निवेदन भारत वानखेडे

माननीय संपादक साहेब कृपया ही बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही विनंती.

2 months ago | [YT] | 1

UK TV NEWS

"भूमी अधिकार पार्टी" BAP पक्षाची घोषणा पालिका निवडणुकीच्या रणांगणात

मुंबई /प्रतिनिधी
दिनांक : 16 डिसे.

मुंबई व महाराष्ट्रातील भूमिपुत्र, गरीब, शोषित व वंचित समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक न्यायापासून दूर ठेवले जात आहे. गावाकडील जमिनी लाटल्या जात आहेत, शहरांतील झोपड्या व वस्त्या पुनर्वसनाच्या नावाखाली उद्ध्वस्त केल्या जात आहेत, स्थानिक तरुणांना डावलून नोकऱ्या बाहेरच्यांना दिल्या जात आहेत आणि भूमिपुत्रांना त्यांच्या स्वतःच्या शहरात दुय्यम नागरिक बनवले जात आहे.

ही लूट, अन्याय आणि शोषण सहन करण्याची वेळ आता संपली आहे. या व्यवस्थेविरोधात थेट संघर्ष करण्यासाठी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांना राजकीय ताकद देण्यासाठी भूमी अधिकार पार्टी (Bhoomi Adhikar Party - BAP) ची स्थापना करण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमी अधिकार पार्टी (BAP) भूमिपुत्रांचे मूलभूत प्रश्न जमीन व घरांचा हक्क, पुनर्वसनातील अन्याय, रोजगार, शिक्षण आणि शहरी विकास - यावर ठाम, स्पष्ट आणि तडजोड न करणारी भूमिका घेऊन मैदानात उतरली आहे.

"भूमिपुत्रांचा एकच नारा नोकरी, शिक्षण आणि निवारा"

हा नारा केवळ घोषणा नसून, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठीचा लढ्याचा स्पष्ट निर्धार आहे.

भूमी अधिकार पार्टी (BAP) ही भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवणाऱ्या धोरणांवर थेट बोट ठेवणार असून, अन्यायकारक व्यवस्थेला आव्हान देत भूमिपुत्रांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणार.

अँड. संतोष सांजकर(.अध्यक्ष)
आयु. संतोष गायकवाड़
आयु. कुमार पाटील.आयु. अविनाश निकम.आयु. वैभव भडांगे.आयु. नूतन सांजकर
उपाध्यक्ष
आयु. आश्रुबा बनसोडे.आयु. राहुल बिरारी.आयु. सुनील सुपे

आयु. दिनेश कोळी.आयु. धनंजय पवार(सचिव)
आयु. मकसूद शेख.आयु. भगवान हिवाळे
.आयु. पार्वताबाई सोनावणे
आयु. ज्योती बाबू
यादी मान्यवर उपस्थित होते
अशी माहिती पत्रकार परिषदेत संतोष सांजकर यांनी पत्रकाराना दिली

2 months ago | [YT] | 1

UK TV NEWS

अप्पा) पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे मुंबई प्रवक्ता तथा सरचिटणीस श्री.प्रमोद (अप्पा) पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये राज्यसभा खासदार श्री.इमरानजी प्रतापगडी यांच्या उपस्थितीमध्ये व मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा खासदार श्रीमती.वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी व युवकांमध्ये प्रामाणिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पक्षप्रवेश केला यावेळी मलाड पश्चिम विधानसभेचे आमदार श्री.असलम शेख मुंबादेवी विधानसभेचे आमदार मा.आमिनजी पटेल तसेच काँग्रेस नेते श्री.सुभाषजी भालेराव उपस्थित होते श्री.प्रमोद पाटील यांचा पक्ष प्रवेश अत्यंत उत्साहात व जोमात आनंदी वातावरणात संपन्न झाला पक्षासाठी नव्या उत्साहाने काम करण्याची वचन ही मा.प्रमोद पाटील व सहकारी यांनी दिली..!!✨🇮🇳

2 months ago | [YT] | 1

UK TV NEWS

"दादर चे चैत्यभूमी ! ' नामकरण ,आनंदराज आंबेडकर देवू देऊ शकतात: वसंत कांबळे

मुंबई (प्रतिनिधी)

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आनंदराज आंबेडकर साहेब हे करवून घेतील .
हा आत्मविश्वास संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील जनतेचा आहे.". ' समाजभूषण वसंत कांबळे ' प्रवक्ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते .
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
" राजकीय सत्ता ही तुमच्या जीवनाच्या विकासाची, गुरुकिल्ली आहे आणि ती तुम्ही मिळविलीच पाहिजे." आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली, राजकीय सत्ता मिळविण्यासाठी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेना शिवसेना युती केलेली आहे.
विश्वभूषण भारतरत्न परम पूज्यनीय, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना ,कोटी-कोटी अभिवादन करताना समाजभूषण वसंत कांबळे म्हणाले , आंबेडकरी समुहाची अनेक वर्षे पासून ची असणारी मागणी आहे , ती म्हणजे " दादर रेल्वे स्टेशन चे नामांतर
' चैत्यमभूमी ' झाले पाहिजे.आणि ते मान्य करून, सरकारकडून मंजूर अमंलबजावणी करून , आनंदराज आंबेडकर साहेबांनी घ्यावे.ही समाजाच्या वतीने मागणी मांडली.ती मागणी कसी योग्य आणि रास्त आहे. कारण दादर पूर्वेला हिंदू कॉलनी येथे रेल्वे स्टेशन लगतच, डॉ.बाबासाहेब आंबेडकरचे वास्तव असणारे निवासस्थान 'राजगृह' आहे.त्याच बरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलें 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन' सुध्दा येथेच आहे .या दोन्ही पवित्र ऐतिहासिक स्थळातून डॉ.बाबासाहेबांनी भारतीय घटनेचा अनेक भाग येथून लिहून देशाला समर्पित केला आहे.
तसेच महामानव बौद्धीसत्व बाबासाहेबांचे महानिर्वाण अंत्यसंस्कारही , दादर पश्चिमेला 'चैत्यभूमी' येथे झालेले आहेत.त्याच बरोबर ' इंदु मिल येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक स्मारक, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी करवून घेतले आहे.या सर्व पवित्र आणि ऐतिहासिक स्थळातून समाजात चैतन्य निर्माण होते.चैत्यस्तुपातून समाजाला जगण्याची उर्जा निर्माण होते. ज्ञान प्राप्त होते.आणि विशेष म्हणजे देशातील, जगातील कानाकोपऱ्यातून सर्व जनता करोडोंच्या संख्येने प्रत्येक वर्षी , 6 डिसेंबर रोजी 'चैत्यभूमी' दादर मुंबई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ! करण्यासाठी येतात. डॉ बाबासाहेबांना कोटी-कोटी विनम्र अभिवादन करून करोडो लोक आपल्या मुलाबाळांसह येऊन दर्शन घेऊन,चैतन्य निर्माण करून जातात. डॉ .बाबासाहेबांच्या या चैत्य स्तुपातून तत्वतः 'चैत्यभूमी' येथून सर्व भारतीय बांधवांना जगण्याची मानवाच्या सर्वांगीण विकासाची उर्जा प्राप्त होते.म्हणूनच 'दादर रेल्वे स्टेशन' चे नामांतर हे' चैत्यभूमी ' झाले पाहिजे.ही मागणी संपूर्ण समाजाच्या वतीने समाज भूषण वसंत कांबळे यांनी प्रकर्षाने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांकडे , आत्मविश्वासाने मांडत,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
.

2 months ago | [YT] | 1

UK TV NEWS

*बिबट्या आणि मानव दोघेही जगले पाहिजेत -डॉ. नामदेव गुंजाळ*

मुंबई - बिबट्या हा निसर्गाचा अविभाज्य घटक असून बिबट्या जगणे हे माणसासाठी उपकारक आहे. त्यामुळे बिबट्या आणि मानव दोघेही जगले पाहिजेत असे मत वाघवर्धिनीचे अध्यक्ष डॉ नामदेव गुंजाळ यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत मांडले आहे.

बिबट्यासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र राखून दिले पाहिजे. सदर प्रस्तावित राखीव क्षेत्रात बिबट्याचे खाद्य मिळाले तर बिबट्या त्याचा अधिवास सोडून मानवी वस्तीत पोटासाठी शिकार शोधायला येणार नाही . यासाठी वाघवर्धिनी संस्थेने संशोधन करून प्रकल्प बनवला आहे. शासनाने मान्यता दिल्यास हा प्रकल्प वाघवर्धिनी संस्था यशस्वीरित्या राबवून दाखवेल अशी हमीही डॉ नामदेव गुंजाळ यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा वावर आणि हल्ले यामुळे निर्माण झालेली दहशत आता असह्य पातळीवर पोहोचली आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. परंतु बिबटे हे वन्यप्राणी आहेत, त्यांना मारणे किंवा खच्चीकरण करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडेल. हे लक्षात घेता बिबट्याना त्यांच्या राखीव क्षेत्रातच त्यांच्या पोट भरण्याची सोय केली पाहिजे, असेल मत नामदेव गुंजाळ यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत मांडले.

डॉ. नामदेव गुंजाळ हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून गेली अनेक वर्षे ते त्यांच्या वाघवर्धिनी संस्थेमार्फत बिबट्याच्या समस्येवर संशोधन आणि काम करत आहेत.

2 months ago | [YT] | 1